वर्तुळाबाहेर माझ्या...
Posted by प्रदीप कुलकर्णी on Saturday, 4 April 2009वर्तुळाबाहेर माझ्या...
बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली
कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी
गझल
वर्तुळाबाहेर माझ्या...
==================
माझ्यावरती त्या झाडाने बर्फ जरासा असा लोटला
झरा वाहिला आशेचा अन् माझा सारा मूड बदलला
गाडीमधून जातांना मी किती पाहिली फुले वेगळी..
त्यांची नावे कळण्याआधी मार्ग कधीचा मागे पडला..
तू दिलेल्या वेदना मी गात नाही
ती उधारी चुकविणे नशिबात नाही
पळणे इतके मुरून गेले
जरा थांबता... थकून गेले
कैक मतले ...फक्त पडलेले!
काफिये...का सर्व अडलेले?!
रोज गगनाची मला पृच्छा.,
"काय तव पंखात दडलेले..?!"
सूर्य संध्येला असा भासे..,
की क्षितीजी रत्न जडलेले!
बांध तोरण जर्द पानांचे..,
रे वसंता...बहर झडलेले!
घुंगरू आले नशीबी अन,
पाय मग हे खूप रडलेले!
का अजूनी शिखर गवसेना..?
पाय तर वेगात पडलेले..?!
सांग ना दरिया मलाही ते..,
शिंपल्याच्या आत घडलेले!
-मानस६
दाटुनी आलो जरी नव्हतो मुळी बहरायला
उगवलो होतो तरी होतो कुठे बहरायला?